प्रकरण १ - पार्श्वभूमी ✦ मुस्लीम कायद्याची तोंडओळख: ‘समान नागरी कायदा’ या विषयावर चर्चा करताना सर्वप्रथम मुस्लीम कायद्याबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. मुस्लीम कायद्याची किमान तोंडओळख तरी असायला हवी. अन्यथा आपण या विषयावर कितीही चर्चा केली आणि सारे मुद्दे पटले तरीही मनात मुस्लीम कायद्याबद्दल द्वेष आणि तिरस्काराची भावना शिल्लक राहतेच. कारण मुस्लीम कायदा रानटी, क्रूर, जालीम आणि अमानवीय कायदा आहे अशीच सर्वसामान्यांची समजूत आहे. इस्लाम जगातील प्रमुख धर्मांपैकी अत्याधुनिक धर्म आहे. मागील १४०० वर्षांपूर्वी जगभरात या संदेशाचा प्रसार प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो त्यांच्यावर) यांच्याकरवी झाला. ३० वर्षांच्या अल्पावधीत निम्म्यापेक्षा जास्त जगाने इस्लामी समाजव्यवस्था आत्मसात केली. इतक्या मोठ्या भूभागावर शासन करण्यासाठी कायदा…
विश्वासघात करू नका जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही.
तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले ... तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले मराठी कुरआन ۞ बिस्मिल्लाह-हिर्रहमान-निर्रहीम ۞ ❝ तो अल्लाहच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग तुम्हाला उपजीविका दिली, मग तो तुम्हाला मृत्यू देईल. मग तो तुम्हाला जिवंत करील. काय तुम्ही मानलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो यापैकी कोणतेही काम करू शकेल? पवित्र आहे तो (अल्लाह) आणि फार उच्च व श्रेष्ठतम आहे तो त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक करीत आहेत. ❞ 📕 पवित्र कुराण ३०:४०