अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते
समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते.
Browsing category
समाजात अनैतिक संबंध वाढल्यास गरिबी आणि लाचारी वाढते.
आपली मुलं आणि नातेवाईक बद्दल रागाच्या भरात श्रापाची मागणी कदापि करू नका. कारण जर त्यावेळी प्रार्थना पूर्ण होण्याची वेळ असेल तर आपली मागणी मान्य. होईल नंतर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल.
स्वतःची चुकी असल्याची जाणीव असूनही जो माणूस भांडतो तो भांडत असेपर्यंत अल्लाच्या प्रकोपात असतो.
तुम्ही दुसऱ्याच्या घरातील स्त्रिया पासून दूर राहा तुमच्या घरातील स्त्रिया देखील सुरक्षित राहतील.
तुम्ही कर्ज घेणे कमी करा जगण्याचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल.
अल्लाहचे भय बाळगा आणि आपल्या नातेवाईकांशी चांगलं वर्तन करत राहा.
असत्त्या पासून दूर राहा कारण असत्य गुन्ह्याकडे घेऊन जातो आणि गुन्हा नरकाकडे.
अश्लीलता आणि अशिष्ट वागणूक व्यक्तीला नष्ट करते. तर लज्जा आणि विनम्रता त्याचे सौंदर्य वाढवते.
डोळ्यात अश्रू नसणे, हृदय कठोर असणे, विनाकारण मोठ्या अपेक्षा ठेवणे आणि जगाबद्दल अति हवस व लालसा ठेवणे या चार गोष्टी दुर्भाग्याची चिन्हे आहेत.
इजा पोहोचविणारी वस्तू रस्त्यापासून दूर करणे सुद्धा पुण्य कार्य आहे.
जो कोणी सत्कर्म आणि कल्याणाचा मार्ग दाखवेल त्या व्यक्तीला देखील त्यावर अमल करणाऱ्या सारख पुण्य मिळेल.
जो व्यक्ती नम्र स्वभावा पासून वंचित असतो तो सर्व लाभापासून वंचित राहतो.
जो व्यक्ती तुमच्यासोबत विश्वासघात करतो तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात करू नका. अर्थातच अल्लाह ला विश्वासघाती लोक अजिबात आवडत नाही.